हमारे पाँव का कांटा हमीसे निकलेगा...
विजय रोजच्या प्रमाणे आजही आपल्या कामावर जाण्यासाठी निघाला. मुख्य रस्त्यावर पोहचताच त्याला प्रचंड वाहतुकीचा सामना करावा लागला. सिग्नलला थांबलेली वाहनं, सिग्नल सुटताच स्पर्धेत धावतात तशी एकमेकांशी स्पर्धा करू लागली. विजयसुद्धा रोजच्या सवयीप्रमाणे रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्सचा सामना करत, खाचखळगे चुकवत आपली बाईक दामटत पुढं जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र दुर्दैवानं त्याच्या बाईकचं मागचं चाक पंक्चर झालं! तेव्हा त्याला थांबणं भागच होतं. विजय आपली बाईक रस्त्याच्या कडेला घेऊन थोडा थांबला आणि आजूबाजूला कुठं पंक्चर काढणारा दिसतो का याचा तो शोध घेऊ लागला. मात्र जवळपास कोणीही न आढळल्यानं तो निराश झाला!
शेवटी बाईक ओढत विजय एका मोठ्या झाडाजवळ आला अन् सावली बघून तिथं थांबला. नंतर तो विचार करू लागला ... माझ्या बाबतीत आज नेमकं असं का घडत आहे? पहाटे अचानक विजपुरवठा बंद झाल्यानं झोपमोड झाली. मग नाइलाजानं लवकर उठावं लागलं. सकाळी दूधवाला पण आला नाही. नंतर इस्त्रीचे कपडे आणायला गेलो तर त्याचंही दुकान बंद! घरून निघताना नेहमी एका किकमध्ये सुरू होणाऱ्या बाईकनं सुद्धा आज त्रास दिला. का व्हावं असं ..? विचार करत असतानाच त्याचं लक्ष पलीकडे झाडाखाली गाणं म्हणणाऱ्या व्यक्तीकडे गेलं. तो आपल्या लाकडी गु-हाळानं ( चरक ) उसाचा रस काढण्यासाठी गाणं गात गोलाकार फिरत होता. त्याचा घामाघूम पण हसरा चेहरा बघताच विजयनं त्याच्या मनात आलेले नकारात्मक विचार क्षणात झटकून टाकले. मग त्यानं आपली बाईक तिकडे नेेेत साईड स्टँडला लावली आणि 'एक ग्लास ऊसाचा रस' अशी आँर्डर दिली.
विजय आता सकारात्मक दृष्टीने विचार करू लागला ... रोज लवकर सुरू होणारी आपली बाईक आज ब-याच प्रयत्नांनी सुरू झाली आणि त्यानंतर आता टायर पंक्चर झाला. म्हणजेच पुढं जाऊन येणारं अरिष्ट टळलं म्हणायचं! आजचा दिवस रजा टाकून सत्कारणी लावायचा विचारही त्याच्या मनात आला. अशाप्रकारचे थोडेफार कमीअधिक प्रसंग प्रत्येकाच्याच जीवनात येत असतात. अशा प्रसंगांना आपण कशाप्रकारे सामोरं जायला हवं हेच यावेळी महत्त्वाचं ठरतं! सकारात्मक विचार मनात असले की आपण निर्णय सुद्धा अचूक घेत असतो. तुमच्यापासून कुणी संपत्ती हिरावून नेऊ शकतो पण तुमची निर्णय घेण्याची क्षमता कोणीही हिरावू शकत नाही. त्यासाठी मनाचं आरोग्य जपणं अशावेळी अतिशय गरजेचं ठरतं! खरंच आपलं मनाचं आरोग्य उत्तम असलं की मग नकारात्मक विचार करायला वेळही मिळणार नाही.
सध्याच्या परिस्थितीत आपल्याला कधी नव्हे इतकी सकारात्मक विचार अंगीकारण्याची नितांत आवश्यकता आहे. या लाॅकडाऊनमुळे एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली असणार, की आपल्या कलांना वाव मिळाला तर आपणही काहीतरी भव्यदिव्य करू शकतो. आतापर्यंत ज्यांना आपण खूप डोक्यावर घेत होतो ( उदा. सिनेमातील नट, क्रिकेट खेळाडू ) ते फक्त आपलं मनोरंजनच करू शकतात हेही एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. त्यांच्यापेक्षा घरी राहून सुद्धा आपापल्या कला सादर करून आपण एकमेकांचं मनोरंजन करू शकतो अन् त्यानं वेगळंच समाधान मिळू शकतं! आजपर्यंत ज्या माॅलमध्ये किंवा हाॅटेल्समध्ये जाऊन निरनिराळ्या पदार्थावर आपण ताव मारून जिभेचे चोचले पुरवत होतो, त्यापेक्षा आपल्या घरी राहून वेगवेगळे प्रयोग करून एकसे बढकर एक चविष्ट पदार्थ करू शकतो असा आत्मविश्वास पण अनेक व्यक्तीत निर्माण झाला आहे.
विदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्ताने जाणाऱ्या लोकांबाबत कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे. तसंच विदेशी लोक खूप हुशार असतात, ते खूप शिकलेले असतात, खूप समजदार असतात असा सामान्य भारतीयांमध्ये समज होता. मात्र आता अख्ख्या जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे "कौन कितने पानी मे है!" हे आपल्याला चांगलंच कळून चुकलंय. यांच्यापेक्षा ज्यांना आपण अत्यंत मागासलेल्या भागातील आदिवासी समजतो, त्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना कितीतरी पटीनं सुज्ञ म्हणता येईल. ते या लाॅकडाऊनच्या काळात गपगुमानपणे सर्व सूचनांचे आणि नियमांचे पालन करताना दिसतात. ते बिचारे हीरोगिरी करत विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरत नाहीत. किंवा तपासणी करायला आलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर दगडफेक करत नाहीत!
या लाॅकडाऊनच्या काळात एक बरं झालं, ताणतणाव वाढवणार्या तसंच प्रेक्षकांचा अंत बघणाऱ्या निरर्थक आणि रटाळ मालिका बंद दाखवणं बंद झालं. त्याऐवजी जुन्या संस्कारक्षम मालिका बघताना जुन्या स्मृतींना उजाळा मिळत आहे. त्याचप्रमाणे ज्यांना रोजच्या धकाधकीच्या व्यग्र जीवनशैलीमुळे आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नव्हता, त्यांना 'वर्क फ्राॅम होम' या अभिनव पद्धतीमुळे ते सहज शक्य झालंय. तसंच ज्या मित्रांशी, नातेवाईकांशी दोन मिनिटं सुद्धा फोनवर बोलता येत नव्हतं त्यांच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधणं आज अगदी सहजतेनं होत असल्याचा सुखद अनुभव आपण घेत आहोत!
एकंदरीतच कृत्रिमपणे जगणं ( जसं हाय, हॅलो करत हात मिळविणे) बंद होऊन आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे दोन्ही हात जोडून नमस्कार करून त्यातला आगळावेगळा आनंद आज आपल्याला प्राप्त होत आहे . भारतातच नाही तर सर्व जगात हीच पद्धत सध्या रूढ आणि लोकप्रिय होताना दिसत आहे. तरीही कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विविध जातीधर्माचे नटलेल्या आपल्या देशात प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. परंतु 'मन मानेल तसं' वागून इतरांना त्याचा त्रास होणार नाही आणि हा त्रास जीवघेणा ठरणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेणं एवढंच आज सर्वांना अपेक्षित आहे! शेवटी प्रसिध्द शायर राहत इंदोरी यांचा शेर पेश आहे...
" ना किसी राहपर, ना राहगुजर से निकलेगा,
हमारे पाँव का कांटा हमी से निकलेगा!!"
...विनोद श्रा. पंचभाई
भ्र.क्र.९९२३७९७७२५