Monday, November 14, 2022

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 


    "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!"अशी ललकारी देऊन इंग्रजांना ठणकावणारे लोकमान्य टिळक स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळेच ते भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम आहेत. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिवजयंती’ उत्सवाला त्यांनी सुरूवात करून दिली.

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर तर आईचं नाव पार्वतीबाई! गंगाधरपंतांना तीन मुलींनंतर मुलगा झाला. त्यांचं नाव केशव ठेवण्यात आलं. मात्र सर्वजण त्याला बाळ या टोपण नावानंच ओळखायचे. त्यामुळे बाळ गंगाधर टिळक या नावानेच त्यांना शाळेत दाखल करण्यात आलं. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. बालपणापासूनच बाळ अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याला गणित विषयाची विशेष रूची होती. तसंच संस्कृत आणि इतर विषयात सुद्धा त्याची छान प्रगती होती.

 वयाच्या दहाव्या वर्षी त्याच्या वडिलांची बदली पुण्याला झाली. पुण्यात आल्यावर बाळला एका इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यात आला. तेथे त्याला अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. अफाट बुद्धिमत्तेमुळे शाळेच्या परीक्षेत त्याचा पहिला नंबर ठरलेलाच असायचा. त्या काळात वार्षिक परीक्षेत खूप कमी विद्यार्थी उत्तीर्ण व्हायचे. त्यामुळे निकालाच्या दिवशी मुलं 'आपण नापास होऊ' या भीतीनं लपून राहायचे. वडील रागावतील, त्यांचा मार बसणार या तणावात त्यांना धड झोपही लागत नसे! मात्र बाळ गंगाधर टिळक यांचं तसं नव्हतं. त्यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो...
बाळच्या वार्षिक परीक्षेचा निकाल आज लागणार होता. सकाळी गाढ झोपलेल्या बाळजवळ त्याची आई गेली अन म्हणाली...
"अरे बाळ किती झोपणार, ऊठ की लवकर. तुझा निकाल आहे ना आज! लवकर आवर बघू."
"हो गं! उठतो मी पण दुसरा क्रमांक कुणाचा आलाय ते तरी कळू दे आधी!"
बाळला माहिती होतं पहिला क्रमांक आपलाच असणार. एवढा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यातील  प्रखर बुद्धिमत्तेमुळे निर्माण झाला होता. निर्भीडता, निग्रही वृत्ती आणि अन्यायाबद्दल चीड हे गुण तर त्यांच्यात जन्मजात होते.

 त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं! त्यानंतर त्यांचा सांभाळ काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वत: अशिक्षित असले तरी त्यांनी बाळला शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं. 1872 साली मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यामुळे त्यांचे मित्र त्यावरून त्यांना सारखे चिडवायचे. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं  आणि एक वर्ष आपलं लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केलं. त्यांनी नियमित कसरती व व्यायाम करणं चालू केलं. आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांच्याकडून कुस्ती व दांडपट्टा चालवणं शिकून घेतलं. पोहणं व नौकाचालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षात त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेलं नव्हतं. त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला. विशेषतः 'मडाले'च्या तुरुंगात कठोर कारावास भोगताना झाला! 1876 साली ते गणित विषय घेऊन बी. ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर 
1879 साली त्यांनी एल.एल.बी. ही कायद्याची पदवी प्राप्त केली. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एलएल.बी. करण्याचं ठरवलं. हा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘‘ज्याअर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्याअर्थी मला असे वाटते, कायद्यअचं ज्ञान मला देशकार्यासाठी उपयोगीच पडेल.’’

  नंतर एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणुन कार्य सुरू केलं. तसंच वकील आणि पत्रकार म्हणूनही त्यांनी कार्य केलं. पत्रकार म्हणुन कार्य करत असताना सगळयाच सामाजिक चळवळींमधे ते सहभागी व्हायचे. ते म्हणायचे  "धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त सन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतु नसावा, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्यासाठी कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पूजा करण्यास शिकायला हवे तेव्हाच परमेश्वराची पूजा करण्यालायक बनू शकू !"
पुढे टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी 1880 साली न्यु इंग्लिश हायस्कुल व महाविद्यालयीन शिक्षणासाठी 1885 साली फर्ग्यूसन काॅलेजची स्थापना केली. त्याच काळात 1881साली जनजागृतीसाठी ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्रं सुरू केली. या वृत्तपत्राच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. 1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला. त्यात त्यांना सहा वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. टिळकांना ब्रम्हदेशातील  'मंडाले'च्या कारागृहात ठेवण्यात आलं. तेथे त्यांनी 'गीतारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहिला. त्यांची इंग्रजी भाषेत सुद्धा पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

अशा या थोर राष्ट्रपुरुषाचं 1ऑगस्ट 1920 रोजी पुणे येथे निधन झालं!
"जनतेसाठी जगलेल्या आणि जनतेसाठी मरण पावलेल्या या थोर पुरुषाला आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाईल,’’ अशा शब्दांत महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली वाहिली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार इतके प्रेरणादायी आहेत,

मै टिंकू...

 मैं टिंकू...


मैं टिंकू, मेरी माँ का नाम मम्मी तथा पिताजी का नाम पप्पा! मेरा नाम ट्विन्कल, पर सभी मुझे टिंकू कहके ही बुलाते है! मैं 'स्टॅण्डर्ड सेकंड' मे पढती हूं, होम वर्क के कारण आज मुझे काफी टेन्शन आया है! मम्मी ऑफिस गयी है और पप्पा उनकी कंपनी मे... अब मुझे कौन मदद करेगा? टेन्शन आया की मैं अपने दादाजी की बताई हुई बातें याद करती हूं! उन्ही बातों मे से एक किस्सा आपको बताना चाहती हूं...
दादाजी ने बताया था, उनके बचपन मे वह दोस्तो के साथ काफी बडे मैदान मे जाकर खेलते थे! उस वक्त उनको ना पढाई का टेन्शन था ना होम वर्क का! खाने का समय हुवा की उनकी माँ उन्हे ढुंढती हुई मैदान पर आती थी... सही मे, मुझे दादाजी ने स्वयं बताया था! फिर दादाजी अपनी माँ के साथ चुपके से खाना खाने घर जाते थे! बाद मे शामको सब दोस्त मिलकर बगिचे मे जाते थे, कभी कभी उनके साथ उनके पापा या चाचा हुवा करते थे! दादाजी को गेंद के साथ खेलना बहोत अच्छा लगता था पर उस वक्त गेंद खरीदने उनके पास पैसे कहां से आते? वह अपने पापा से पैसे मांगने की हिम्मत नहीं जुटा पाते! किसी दिन किसी दोस्त ने कभी गेंद लाई तो फिर क्या कहना... पसीना पसीना होने तक गेंद खेलते रहना, बगिचा बंद होने तक!
आज मेरे पास मम्मी, पप्पा ने दिये हुवे इतने पैसे है, खिलोने भी ढेर सारे है... गेंद तो एक क्या, चार पांच तो होगी ही! मगर खेलूं तो खेलूं किसके साथ? इन बेजुबान दिवारों के साथ या दरवाजों, खिडकियों के साथ? सभी दोस्त अपने अपने घरों मे पढाई या होम वर्क मे डुबे रहते है! किसीको बाहर निकलने की घडीभर की भी फुरसत नहीं, कसमसे!
मुझे आजकल दिलसे ऐसा लगता है, अपने दादाजी की तरह खूब खेलना चाहिये, मस्त घुमना फिरना चाहिये, मैदान मे जाकर खूब भागना चाहिये... पुरी तरह थकने तक! कहीं दूर जाकर डुबते सूरज का आनंद लेते बैठे रहना और फिर मम्मी ने मुझे ढुंढते हुवे वहाँ पहुंचना, बादमे उसने प्यार से अपने पास लेना... सही मे मुझे ऐसा रह रह के लगता है, दिलसे कहती हूं मैं!
 घर मे टीव्ही शूरू किया तो उसमे हर कोई आपस मे बातें करते रहते है, मुझसे कोई बात ही नहीं करता... क्यो मैं उनकी बातें सुनू , वह हमेशा झगडते रहते है! और आजकल कार्टून भी बोअर करते है, फिर मैं टीव्ही बंद करके हमारी गॅलरीसे नीचे की गलीमे कुत्ते के बच्चे देखती रहती हूं! वो मुझे बहोत अच्छा लगता है! परसो मैने एक कुत्ते का बच्चा अपने घर लानेकी जिद की तो पप्पा बोलें... 'खबरदार, फिरसे कभी कुत्ते का नाम लिया तो तुम्हारी टांग तोडकर हाथ मे दे दूंगा!' उस रात सहीमे मुझे नींद नही आई, बार बार कुत्तेका बच्चा नजर के सामने आता रहा! कुछ देरके बाद अपनी आंखे मुंद ली,  तो बडेसे मैदान मे दादाजी दौडतें हुवे दिखाई दिये और उनके साथ कुत्ते का बच्चा भी दौड रहा था! वह सब देखकर मेरी आंखे भर आई मगर नींद नही आई!
 सुबह उठकर देखा तो पप्पा पहले ही बाहर गये थे और मम्मी उसके काम मे लगी हुई थी! मैने मम्मी से कहा, 'मम्मी मैं आज स्कुल नहीं जाऊंगी, मेरे पेट मे कुछ गडबड है' उसपर मम्मी अचानक भडक कर बोली... ''तेरी ऍडमिशन के लिये हजारो रुपियोंका डोनेशन दिया हमने और तुझे छुट्टी मारना है! चल जल्दीसे तय्यार होना है तुझे, मेरा दिमाग मत खा टिंकू!'
पता नही क्यो इतने मे मम्मी ठिकसे बात भी नहीं करती मुझसे, पप्पा के साथ झगडा हुवा था इसीलिये शायद! कभी भी दादी दादाजी जैसे प्यार से पास लेकर बातें नहीं करती मम्मी... अब मैं क्या करू? किससे बात करू? पप्पा को कहा, हम संडे को दादाजी के गांव जायेंगे, तो उन्होने साफ इन्कार कर दिया!
  अब मैने मन ही मन फैसला कर लिया है, दादाजी आयेंगे तो उन्हे अपनी दिलकी बातें जरूर बताऊंगी! स्कुल की एक्झाम के बाद धुपकाले की छुट्टीयां लगेगी तब मुझे अपनी मर्जीसे खेलना है... उस वक्त दादाजी जरूर आयेंगे, उनके पीछे लगकर गांव जाना है मुझे! फिर उधर गांवकीही स्कुल मे मेरा ऍडमिशन कराने के लिये मैं दादाजी को मना लुंगी! वैसे भी इधर मम्मी, पप्पा मेरे होम वर्क पर कभी ध्यान नही देते, दिवाली की छुट्टीयों मे दादाजीने पढायी हुई कविताए मुझे आज भी याद है! गांव की स्कुल मे मेरा ऍडमिशन हो गया तो कितना अच्छा होगा, हर रोज दादाजी मुझे स्कुल छोडने आयेगे! उस वक्त उनके साथ मस्त घुमते हुवे स्कुल जाने मे बहोत मजा आएगा... यहां स्कुलबस की राह देखते हुवे उब जाती हूं मैं, ढेरसारी गाडीयों के आवाज से काफी परेशानी भी होती है! ये सब गांव मे नही होगा, वहां के माहोल मे कुछ तो सुकून मिलेगा!
छुट्टी के दिन दादाजी के साथ गांव की नदीके किनारे सैर करने जाया करुंगी, वहांकी सहेलीयों के साथ खूब खेलूंगी! सचमुछ ऐसा होगा ना? मैने दिलमे जो सोच रखा है वैसा होना चाहिये, क्यो नहीं होगा? मैं जो भगवान से रोज दिलसे प्रार्थना करती हूं! दादाजी कहते है... 'हम अगर दिलसे, सच्ची लगन से भगवान की प्रार्थना करते है तो वह जरूर सुनता है!'
मैं भगवान से तहे दिलसे प्रार्थना करती हूं, बिनती करती हूं, 'मेरे दादाजी को यहां मेरे पास जल्द से जल्द भेजे और मैने जो चाहा है, मेरी मनोकामना पुरी करे!'

विनोद श्रा. पंचभाई

वळण... शिस्त

 वळण... शिस्त


आपल्या भारत देशाचे तिसरे राष्ट्रपती होऊन गेलेले डॉ. झाकिर हुसेन हे शाळेत शिकत असताना त्यांना शिकवणारे शिक्षक सय्यद अल्ताफ हुसेन हे कडक शिस्तीबद्दल तेथे प्रसिद्ध होते. विद्यार्थ्यांना नीट वळण लागावं यासाठीच त्यांची शिस्त असायची. मुलांवर आदर्श संस्कार व्हावेत, त्यांनी स्वावलंबी बनावं यासाठी ते आग्रही होते. छोटा झाकिर लाडात आणि श्रीमंतीत वाढलेला होता. तसेच शाळेत न जाता त्यांनी घरी एका इंग्लिश मॅडमकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले होते. त्यावेळी नुकतेच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते! मुळातच हुशार असलेले झाकिर हुसेन शिक्षकांच्या शिस्तीमुळे घडत गेले. शिक्षक सय्यद साहेब त्यांच्यातील गुणांची वाहवा करायचे. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे झाकिरवर शाळेपासूनच जीवनातील आदर्श संस्कार रूजले गेले. नंतर ते त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी पडले. 


आधीच्या काळात म्हणजे आधुनिक सुखसोयी सहजतेनं  उपलब्ध होण्यापूर्वी आपल्याकडे बहुतेकांचा स्वावलंबनाकडे ओढा होता. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापलं काम अगदी मन लावून करायची. घरातील पाणी भरणं, दूध आणणं, बाजारातून रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आणणं आणि इतर किरकोळ कामे स्वतः करण्यावर भर होता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की माणूस नको तितका परावलंबी झाला आहे. त्यामुळे पालकच आळसपणा करत असतील तर त्यांची मुलंसुद्धा परावलंबी होणारच! आजकाल घरोघरी आपण बघतो, मुलांना सगळं कसं हातात हवं असतं. घरून अगदी चार पावलांवर जायचं असलं तरी त्यांना गाडी हवी असते. काही घरात तर स्वतः पालकच आपल्या मुलांचे 'होमवर्क' करून देताना दिसतात. हे कुठंतरी थांबायला हवं. आजच्या पिढीला पालकांनी तसंच शिक्षकांनी योग्य वळण वळण लावून शिस्तीचे धडे देणं हे कधी नव्हे इतकं आज नितांत गरजेचं झालं आहे.


'आधी केले मग सांगितले!' किंवा 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!' या उक्तीनुसार पालकांनी स्वतःच्या कृतीतून शिस्तीचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवणं आजघडीला अत्यंत गरजेचं आहे. कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात. घरातील आईवडिल जसे वागतील,  त्याप्रमाणेच त्यांची मुलंही आचरण करणार हे निश्चित! आजची परिस्थिती जर बदलली नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला खूप भयंकर समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे जास्त उशीर न करता आजच्या सुजाण पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबनाचं महत्त्व पटवून देणं आणि त्याप्रमाणे शिस्त लावणे, त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून देणं हे आपलं आद्य कर्तव्यच समजायला हवं. तसंच त्याबाबतचं गांभीर्य ध्यानात घेऊन सतत पाठपुरावा करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी घरी असताना मुलांसमोर तरी आपला मोबाईल प्रयत्नपूर्वक स्वतःपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. तसेच मुलांसमोर जास्त वेळ टीव्ही न बघता एखादं पुस्तक किंवा मासिक, वर्तमानपत्र वाचनात वेळ घालवला तर मुलंही उत्सुकतेनं तुमचं अनुकरण करतील. त्यासाठी निश्चितच पालकांना आपला वेळ द्यावा लागणार आहे. आपल्या मुलांकरीता तसा प्रयत्न करायला तरी हरकत नसावी!


एकदा का मुलांना स्वावलंबनाचं वळण लागलं की मग जगण्याला शिस्त लागायला वेळ लागणार नाही. पर्यायानं त्यांच्यात सकारात्मक वृत्ती वाढणार हे वेगळं सांगायला नको. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच मुलांना योग्य वळण लावणं, निदान पालकांनी तसा प्रयत्न करणं आजच्या परिस्थितीत खूपच आवश्यक आहे. आपण बघतो, आजकाल घराघरात मुलं त्यांच्या अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि मग सकाळी उठायला त्यांना नऊ दहा वाजतात. उलट रात्री लवकर झोपून पहाटे उठणं कधीही चांगलं! कारण पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो हा अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी मुलांना अगदी लहानपणीच सकाळी लवकर उठण्याची सवय ( शिस्त ) लावणं तसेच उठल्यावर स्वतःच्या पांघरूणाची घडी घालायला लावणं हे शिस्त लावण्याच्या दृष्टिने गरजेचं वाटतं. सुरूवातीला मुलांना थोडा कंटाळा येणार, नाही असं नाही मात्र हळूहळू मुलं मोठी झाली की त्यांच्या अंगी नीटनेटकेपणा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपली अभ्यासाची पुस्तकं, वह्या आणि इतर वस्तू नीटनेटकेपणानं जागच्या जागी ठेवणं, सकाळी शाळा असल्यास स्वतःच स्वतःची तयारी करणं, शाळेतून परत आल्यावर दप्तर, बूट वगैरे ठराविक जागीच ठेवणं अशा चांगल्या सवयींची शिस्त मुलांना क्रमाक्रमाने तरी लागणारच.  शिवाय त्यांना सकाळचा नाश्ता अन् दूध पिणं झाल्यावर स्वतःची कपबशी विसळणं, एखादा हातरूमाल धुणं, थोडं वय वाढल्यावर कपड्यांची इस्त्री करणं ही कामे सुद्धा त्यांना त्यांच्या कलाने करायला लावली तर ती स्वावलंबी होणारच आणि मग त्यांना शिस्त लागायला वेळ लागणार नाही! 


आजकाल बर्याच घरात एकुलतं एकच मूल असल्याचं बघण्यात येतं. त्यामुळे त्याची आवडनिवडही प्रमाणाबाहेर जपली जाते. त्याचे नको तेवढे लाड पुरवले जातात. जेवण किंवा काही खाण्याच्या बाबतीत 'मूल म्हणेल तीच पूर्व दिशा' असंही घराघरात आढळून येतं. मग हतबल झालेले पालक मूल मोठं झाल्यावर सुद्धा, ते हट्टी झाल्यानं त्याचे लाड पुरवतात. अशाप्रकारे त्या लाडोबाचेच ऐकत गेल्यास पालकांची अवस्था दयनीय व्हायला वेळ लागत नाही. हे सर्व थांबावं असं वाटणं साहजिकच आहे. मात्र त्यासाठी पालक स्वतः सद् वर्तनी असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच ते आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून सुसंस्कारित होण्याच्या दृष्टिने त्यांना छोट्याछोट्या गोष्टीतून शिस्त लावू शकतील. चांगल्या सवयी लावू शकतील. 'आळस हा आपला पहिल्या नंबरचा शत्रु आहे' हे मुलांच्या मनावर बिंबवू शकतील!


अशाप्रकारे मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच योग्य वळण लागलं तर त्यांना एकप्रकारची शिस्तही आपसूकच लागणार. मुलं स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकताही वाढेल. पर्यायाने त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच त्यांना जगण्याची योग्य दिशा लाभणार हे नक्की! मग सर्व दृष्टिने 'मॅच्यूअर्ड' झालेली ही मुलं आपल्या आईवडिलांसोबतच इतर थोरामोठ्यांचाही आदर राखतील हे वेगळं सांगायला नको. त्यांच्यात आपल्या गुरूजनांबद्दल, समाजाबद्दल तसेच आपल्या देशाबद्दल प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत होत राहणार हेही ओघाने आलंच. त्याकरीता पालकांना आवश्यकता आहे ... हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मुलांना अगदी सुरुवातीपासून योग्य वळण आणि शिस्त लावण्याची ... आणि त्यासाठी स्वतःपासून सुरूवात करण्याची!!



..... विनोद श्रा.पंचभाई, 

       वारजे, पुणे

       भ्र.क्र.९९२३७९७७२५


सदाचार आणि प्रामाणिकपणा

सदाचार आणि प्रामाणिकपणा

लालबहादूर शास्त्रीजींचे सदाचार आणि प्रामाणिकपणाचे किस्से सर्वश्रुत आहेत. तसेच त्यांच्या साधेपणाचे, सच्चेपणाचे अनेक प्रसंगही प्रसिद्ध आहेत. त्यातील काही प्रसंग याठिकाणी आवर्जून नमूद करणे निश्चितच औचित्याचे ठरेल.
सायंकाळची वेळ होती. शास्त्रीजी नुकतेच घरी पोहचले होते. पत्नी ललितादेवी यांच्यासोबत त्यांचे कुठल्यातरी घरगुती विषयावर बोलणे सुरू होते. तेवढ्यात अचानक शास्त्रीजींचे एक जवळचे मित्र त्यांच्याकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून न राहवून शास्त्रीजींनी त्यांना कारण विचारलं. ते हात जोडून हळू आवाजात म्हणाले, "शास्त्रीजी घरी पत्नीची तब्येत खालावली आहे. तिच्या औषधासाठी माझ्या जवळ पुरेसे पैसे नाहीत. तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलो आहे. कृपाकरून मला पन्नास रुपये उसने द्या. थोडे थोडे करून मी नक्की परत करणार!"
"यावेळी पन्नास रुपये तर माझ्याजवळ नाहीत. पाच दहा रुपयाची मदत मी आता करू शकतो." शास्त्रीजी नम्रपणे म्हणाले. त्यांच्या उत्तराने निराश झालेले मित्र उठले आणि जाण्यासाठी वळले. तेवढ्यात ललितादेवीनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या, "थांबा भाऊजी, मी देते तुम्हाला पन्नास रुपये!"
ते ऐकून शास्त्रीजी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी ललितादेवींना विचारलं, "तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलेत?"
त्यांनी हसतच उत्तर दिलं, "तुम्ही पगाराचे पन्नास रुपये माझ्याकडे देता ना, त्यातून मी घरखर्च करताना काटकसर करून दर महिन्याला पाच रुपये वाचवत होते. तेच जमा होऊन आता पन्नास रुपये झाले आहेत. मी लगेच घेऊन येते हं!"
आता पैसे मिळणार म्हणून मित्राचा चेहरा उजळला. मात्र शास्त्रीजी गंभीर झाले होते. ते विचारात पडले. तेवढ्यात ललितादेवींनी त्यांच्या हातावर आतून आणलेले पन्नास रुपये ठेवले. ते त्यांनी मोजून मित्राकडे दिले. पैसे मिळताच ते जागेवरून उठले आणि समाधानाने घराबाहेर पडले. शास्त्रीजी मात्र अजूनही गंभीरच होते. ते काही बोलले नाही.
दुसऱ्या दिवशी कार्यालयात गेल्यावर त्यांनी लगेच एक अर्ज लिहिला. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे होता...
'मला सध्या मिळत असलेल्या पगारातून कृपया पाच रुपये कपात करण्यात यावी. पंचेचाळीस रुपयात माझा महिन्याभराचा खर्च भागत असल्यामुळे तेवढा पगार पुरेसा आहे.'

एकदा शास्त्रीजी आठवडे बाजारात गेले होते. भाजी आणि इतर साहित्य वगैरे घेतल्यावर ते चालतच घराकडे निघाले. घरी पोहचल्यावर त्यांनी पिशव्या ललितादेवींच्या ताब्यात दिल्या आणि ते बाजारातील खर्चाचा हिशेब करू लागले. शास्त्रीजींना रोजचा खर्च नोंदवून ठेवण्याची सवय होती. त्याप्रमाणे हिशेब करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, भाजीवाल्याकडून आपल्याला दहा पैसे जास्त आले आहेत. त्यांनी ते लगेच परत करण्याचा निर्णय घेतला आणि जागेवरून उठले. तेवढ्यात ललितादेवींनी त्यांना विचारलं, "काय झालं? तुम्ही आताच तर घरी आलेत आणि आता परत कुठं निघाले ?"
"भाजीवाल्याचे पैसे परत करायला. त्यानं पैसे परत करताना चुकून दहा पैसे मला जास्त दिले. मी जाऊन येतो लगेच..." शास्त्रीजी लगीबगीन म्हणाले.
"अहो आता सायंकाळ झाली आहे. चांगलं अंधारून आलंय. कधीही पाऊस येऊ शकतो. तुम्ही उद्या गेले तरी चालेल. आताच एवढं दोन किलोमीटर चालत आले!" ललितादेवी काकुळतीनं बोलल्या.
"उद्या तो भाजीवाला कसा भेटणार? आठवडे बाजार आता पुढच्या आठवड्यात भरणार ना, मला आताच गेलं पाहिजे. चल मी जाऊन येतो तोपर्यंत तू घरातील आवरून घे!" शास्त्रीजी ठामपणे म्हणाले अन घराबाहेर पडले सुद्धा. मग ते दोन किलोमीटर चालत आठवडे बाजारात पोहचले. नंतर त्या भाजीवाल्याला शोधून त्यांनी त्याला दहा पैसे परत केले आणि दिलगिरी व्यक्त केली. शास्त्रीजींचा प्रामाणिकपणा पाहून भाजीवालाही आश्चर्यचकित झाला! 
असे होते आपले थोर शास्त्रीजी. त्यांनी आपल्या आचरणातून जीवन कसे जगावे याचा वस्तूपाठ आणि आदर्श घालून दिला, जो आजच्या नेते मंडळीत औषधालाही सापडणार नाही. पुढे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीत भीषण रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी राजीनामा दिला होता.

 काही काळ उलटल्यावर  पंडित नेहरू यांच्या निधनानंतर शास्त्रीजी पंतप्रधान पदावर विराजमान झाले. पुढच्याच वर्षी म्हणजे 1965 साली झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धमुळे त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शास्त्रीजींनी परिस्थितीचे भान ठेवून स्वतःचे मानधन घेणे बंद केले. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत एक घटना घडली. त्यावेळी शास्त्रीजींना कठोर निर्णय घ्यावा लागला. त्यांचा धाकटा मुलगा हरी याचे काही व्यापाऱ्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्याने वडिलांच्या अधिकार पदाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांसाठी कामे केल्याचा आरोप हरीवर ठेवण्यात आला. हे प्रकरण शास्त्रीजींच्या कानावर पडताच त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानातून मुलाला बाहेर काढले होते.
शास्त्रीजी पंतप्रधान पदावर असताना सुद्धा त्यांची वागणूक अत्यंत साधी होती. त्यांनी कधीही सरकारी गाडीचा वापर केला नाही. मात्र त्यांच्या मुलाने स्वतःच्या खाजगी कामासाठी एकदा सरकारी गाडी वापरली. तेव्हा ती गोष्ट शास्त्रीजींना समजताच त्यांनी किलोमीटरच्या हिशेबाने पेट्रोलची रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली होती.