Monday, November 14, 2022

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 


    "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!"अशी ललकारी देऊन इंग्रजांना ठणकावणारे लोकमान्य टिळक स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळेच ते भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम आहेत. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ’सार्वजनिक गणेशोत्सव’ आणि ’शिवजयंती’ उत्सवाला त्यांनी सुरूवात करून दिली.

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर तर आईचं नाव पार्वतीबाई! गंगाधरपंतांना तीन मुलींनंतर मुलगा झाला. त्यांचं नाव केशव ठेवण्यात आलं. मात्र सर्वजण त्याला बाळ या टोपण नावानंच ओळखायचे. त्यामुळे बाळ गंगाधर टिळक या नावानेच त्यांना शाळेत दाखल करण्यात आलं. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. बालपणापासूनच बाळ अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याला गणित विषयाची विशेष रूची होती. तसंच संस्कृत आणि इतर विषयात सुद्धा त्याची छान प्रगती होती.

 वयाच्या दहाव्या वर्षी त्याच्या वडिलांची बदली पुण्याला झाली. पुण्यात आल्यावर बाळला एका इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यात आला. तेथे त्याला अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. अफाट बुद्धिमत्तेमुळे शाळेच्या परीक्षेत त्याचा पहिला नंबर ठरलेलाच असायचा. त्या काळात वार्षिक परीक्षेत खूप कमी विद्यार्थी उत्तीर्ण व्हायचे. त्यामुळे निकालाच्या दिवशी मुलं 'आपण नापास होऊ' या भीतीनं लपून राहायचे. वडील रागावतील, त्यांचा मार बसणार या तणावात त्यांना धड झोपही लागत नसे! मात्र बाळ गंगाधर टिळक यांचं तसं नव्हतं. त्यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो...
बाळच्या वार्षिक परीक्षेचा निकाल आज लागणार होता. सकाळी गाढ झोपलेल्या बाळजवळ त्याची आई गेली अन म्हणाली...
"अरे बाळ किती झोपणार, ऊठ की लवकर. तुझा निकाल आहे ना आज! लवकर आवर बघू."
"हो गं! उठतो मी पण दुसरा क्रमांक कुणाचा आलाय ते तरी कळू दे आधी!"
बाळला माहिती होतं पहिला क्रमांक आपलाच असणार. एवढा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यातील  प्रखर बुद्धिमत्तेमुळे निर्माण झाला होता. निर्भीडता, निग्रही वृत्ती आणि अन्यायाबद्दल चीड हे गुण तर त्यांच्यात जन्मजात होते.

 त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं! त्यानंतर त्यांचा सांभाळ काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वत: अशिक्षित असले तरी त्यांनी बाळला शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं. 1872 साली मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यामुळे त्यांचे मित्र त्यावरून त्यांना सारखे चिडवायचे. त्यांनी हे आव्हान स्वीकारलं  आणि एक वर्ष आपलं लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केलं. त्यांनी नियमित कसरती व व्यायाम करणं चालू केलं. आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांच्याकडून कुस्ती व दांडपट्टा चालवणं शिकून घेतलं. पोहणं व नौकाचालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षात त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेलं नव्हतं. त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला. विशेषतः 'मडाले'च्या तुरुंगात कठोर कारावास भोगताना झाला! 1876 साली ते गणित विषय घेऊन बी. ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर 
1879 साली त्यांनी एल.एल.बी. ही कायद्याची पदवी प्राप्त केली. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एलएल.बी. करण्याचं ठरवलं. हा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘‘ज्याअर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्याअर्थी मला असे वाटते, कायद्यअचं ज्ञान मला देशकार्यासाठी उपयोगीच पडेल.’’

  नंतर एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणुन कार्य सुरू केलं. तसंच वकील आणि पत्रकार म्हणूनही त्यांनी कार्य केलं. पत्रकार म्हणुन कार्य करत असताना सगळयाच सामाजिक चळवळींमधे ते सहभागी व्हायचे. ते म्हणायचे  "धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त सन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतु नसावा, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्यासाठी कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पूजा करण्यास शिकायला हवे तेव्हाच परमेश्वराची पूजा करण्यालायक बनू शकू !"
पुढे टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी 1880 साली न्यु इंग्लिश हायस्कुल व महाविद्यालयीन शिक्षणासाठी 1885 साली फर्ग्यूसन काॅलेजची स्थापना केली. त्याच काळात 1881साली जनजागृतीसाठी ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्रं सुरू केली. या वृत्तपत्राच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. 1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला. त्यात त्यांना सहा वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. टिळकांना ब्रम्हदेशातील  'मंडाले'च्या कारागृहात ठेवण्यात आलं. तेथे त्यांनी 'गीतारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहिला. त्यांची इंग्रजी भाषेत सुद्धा पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

अशा या थोर राष्ट्रपुरुषाचं 1ऑगस्ट 1920 रोजी पुणे येथे निधन झालं!
"जनतेसाठी जगलेल्या आणि जनतेसाठी मरण पावलेल्या या थोर पुरुषाला आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाईल,’’ अशा शब्दांत महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली वाहिली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार इतके प्रेरणादायी आहेत,

No comments:

Post a Comment