मंगलमय दिवाळी पाडवा
आपल्या भारतीय लोकांमध्ये निरनिराळे सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात कमालीचा उत्साह आढळून येतो. असाच दिवाळी हा आपला एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रमुख सण! अश्विन महिन्यात येणाऱ्या या सणात थंडीची चाहूल लागली असते. हवेत सुखद गारवा जाणवतो. अशा या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दिवाळी सण साजरा करण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो. तसं पाहिलं तर 'वसुबारसे'च्या दिवसापासून या सणाची सुरूवात होते, मात्र दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत पाच दिवसांचा! पहिल्या दिवशी धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी आणि तिसऱ्या दिवशी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. मग दिवाळीच्या चौथ्या दिवशी येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी असलेल्या दिवाळी पाडवा या दिवसाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
विक्रम संवत् कालगणनेचा प्रारंभही याच पाडव्याच्या दिवसापासून होतो. उज्जैनीचा महापराक्रमी राजा असलेला विक्रमादित्य याने परकीय शकांचे आक्रमण परतवून लावत त्यांचा पराभव केला. त्या रोमहर्षक विजयाचं प्रतीक म्हणून राजा विक्रमादित्य याने 'विक्रम संवत्' ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व ५७ पासून ही कालगणना अजूनही प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचं, सभ्यतेचं आणि न्यायप्रिय एकछत्री राज्य व्यवस्थेचं हे गौरवशाली उदाहरण आहे.
दिवाळी पाडवा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. बळीराजासारख्या प्रजाहितदक्ष, पराक्रमी आणि दानशूर असलेल्या मात्र नंतर अहंकारी बनलेल्या राजाला बटु वामनाचं रूप घेतलेल्या श्रीविष्णूने तीन पावलांचं दान मागून भानावर आणलं अशी पौराणिक कथा आहे. या बळीराजाचाच बलिप्रतिपदा हा दिवस मानला जातो.
त्याचप्रमाणे गोकुळातील सर्वसामान्य गोपगोपियांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता अशी आख्यायिका आहे. या घटनेचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन आपल्या देशाच्या काही भागात दिवाळी पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले वाहिली जातात. तसेच श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती मांडून त्याची मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर गावातील गोधन म्हणजे गायी, वासरांना सुशोभित करून, त्यांची पूजा करून उत्साहात मिरवणूकही या दिवशी काढली जाते. गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्यामुळे पूजा करणाऱ्यांना श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद् गुणांचे संवर्धन होते अशा प्रकारची भावना श्रध्दावान लोक व्यक्त करतात.
पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतीक असणारा कार्तिक महिन्याचा पहिला दिवस असलेला हा दिवाळी पाडवा आणखी एका दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडील परंपरेने पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे.
आपल्या मनात दिवाळीच्या पाडव्याविषयीचे एक पारंपरिक चित्र रेखाटलं गेलं आहे...नवीन पेहराव आणि आभुषणं परिधान केलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आहे. निरांजनातल्या ज्योतींचा मंद प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यांवर पडतो आणि त्यात परस्परांविषयीचा विश्वास, प्रेम आणि आदर प्रकर्षाने जाणवतो. आजही हे चित्र बदललेलं नाही!
आज आपण बघतो, आपल्या देशात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. स्वतंत्रपणे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व व्यवसाय आत्मविश्वासाने सांभाळताना त्या दिसतात. अगदी मोलकरणीपासून वैमानिकापर्यंत स्त्री समर्थपणे कार्य करताना आपण बघतो. नोकरी करणाऱ्यांना तर अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. तरीही आपलं घर प्रेमानं आणि जबाबदारीनं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन करणारी, आपल्या कुटुंबात सामंजस्य राखण्यासाठी सदैव झटणारी तसेच सासर आणि माहेरच्या नात्यातला स्नेह जोपासला जावा यासाठी सजग असणारी अशी भारतीय स्त्रीची कितीतरी रूपे आपल्या समाजात बघायला मिळतात. मात्र आपल्या संस्कारांना प्राधान्य देऊन तसेच परंपरांचा मान राखून आपल्याकडील स्त्रिया अतिशय उत्साहानं दिवाळी पाडवा साजरा करताना दिसतात.
अतुट विश्वास आणि प्रेम यावर आधारलेलं पती-पत्नीचं नातं निभवायला तसं सर्वात कठीण! एक उत्तम सहजीवन साकारणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे. त्यासाठी दोघांनाही अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागतं! निरनिराळ्या जबाबदाऱ्या सतत पार पाडाव्या लागतात. एकमेकांचे स्वभाव, आजूबाजूची बदलती परिस्थिती, सतत बदलणारा काळ, वाढत जाणारं वय, जीवनात येणारे कटु- गोड अनुभव यामुळे पती - पत्नीचं नातं अधिकाधिक प्रगल्भ होत गेलं पाहिजे अशी दोघांचीही अपेक्षा असते. मात्र हे नातं आयुष्यभराच्या एकमेकांच्या सततच्या सहवासाचं असल्याने काहीवेळा ते अधिक गुंतागुंतीचं आणि अवघड बनून जातं. परस्परांविषयीचे समज-गैरसमज, संशय, एकमेकांना गृहीत धरण्याची सवय, एककल्ली वृत्ती अशा अनेक गोष्टींचं गालबोट या नात्याला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कधीतरी झालेल्या या गैरसमजुती विसरूनच नव्याने या नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न पाडव्याच्या या मंगलमय दिवशी मनापासून केला जातो.
कधीकधी पती-पत्नीमध्ये आपसात गैरसमज झाल्याने सुरुवातीला हे जमत नाही. दोन्ही बाजूंनी तीव्र शाब्दिक चकमक झाल्याने वाद, भांडणं होऊ शकतात. दुरावाही निर्माण होण्याची शक्यता असते ; पण जसजसे सहजीवन परिपक्व होत जाते तसतशी एकमेकांच्या स्वभावाची अन् उणिवांची खरी ओळख पटत जाते आणि त्याप्रमाणे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व प्रवासात पती आणि पत्नी हे नातं बरोबरीचं आहे याची जाणीव मात्र दोघांना आणि कुटुंबातील इतरांनाही होणे अतिशय आवश्यक ठरते. आपसातील विश्वास, सामंजस्य कायम राखल्यास मग घराला घरपण आल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने नात्यातला जिव्हाळा, आपुलकी वृद्धिंगत होणार हे निश्चितच आणि त्याचंच प्रतीक म्हणून पाडवा साजरा केला जावा. तो केवळ फादर्स डे किंवा मदर्स डे सारखा पती-पत्नी डे असा एकच दिवस न राहता कायम रोज स्मरणात राहण्यासारखा असावा. एकमेकांसाठी म्हणून काही गोष्टी आनंदाने करण्याचा असावा. पती-पत्नीतल्या नात्याला दृढ करणारा, एकमेकांच्या साथसंगतीने वाढण्याचा, परस्परांविषयीचं प्रेम, विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा असावा! म्हणूनच म्हणावेसे वाटते .....
जपण्यासाठी आपसातील नात्यातला गोडवा!
साजरा करूया आनंदाने हा मंगलमय पाडवा!!
...विनोद श्रा. पंचभाई, वारजे पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

No comments:
Post a Comment