आम्ही दोघी...
"नमस्कार मँडम, मी सोनू, सोनल सुरेशराव कदम आणि ही माझी जुळी बहीण मोनू. आमच्या बाबांची बदली नाशिकवरून या शहरात झाल्यानं आम्ही इथं प्रवेश घेतला आहे... सहाव्या वर्गात!"
"बरं! मग काय..?" आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत शाळेच्या कार्यालयातील त्या मँडमनं विचारलं.
"आमचा वर्ग कुठं आहे ते सांगा ना प्लीज!" सोनू नम्रपणे म्हणाली.
"एक मिनिट हं... तुम्ही इयत्ता '६ ड' मध्ये जाऊन बसा ... दुसऱ्या मजल्यावर आहे पलीकडे..." टेबलावरच्या रजिस्टर मधील दोघींच्या नावाच्या नोंदी बघून मँडमनी तिला सांगितलं.
"धन्यवाद मँडम" आभार व्यक्त करुन सोनू आणि मोनू '६ ड' वर्गाच्या दिशेने निघाल्या. पायर्या चढत असताना त्यांना मुलींचा गोंगाट ऐकू आला. मग दुसऱ्या मजल्यावर येताच त्यांना दुरूनच 'इयत्ता ६ ड' पाटी दिसली. दोघीही एकाच वेळी वर्गात शिरल्यानं गोंगाट करत असलेल्या मुली एकाएकी शांत झाल्या अन् सोनू-मोनूकडे बघतच राहिल्या! त्या दोघीही जुळ्या बहिणी असल्यानं त्यांच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य होतं. मग वर्गातील मुली आपसात कुजबुज करू लागल्या... "अगं बघतेस ना विजू, कसल्या भारी दिसतात त्या दोघी!"
"हो ना! खरंच, अगदी सिनेमातल्यासारखा डबल रोलच गं...! बरं का शितू, आपण ना त्यांच्याशी बोलूया आणि मैत्री करून घेऊ...मग काय मस्त धम्मालच..." विजू आपली मैत्रीण शितूला टाळी देत म्हणाली.
" हो हो नक्कीच गं ... चल उठ लवकर, त्यांना गाठूया आपण..." शितू आपल्या जागेवरून लगेच उठली अन् विजूचा हात धरत म्हणाली.
शितू आणि विजू त्या दोघींकडे जायला वळल्या. तोपर्यंत सोनू मोनूच्या भोवती वर्गातील बर्याच मुली गोळा झालेल्या होत्या आणि कुतुहलाने बघत होत्या. त्या दोघी मात्र थोड्या गोंधळल्या...काय करावं, काय बोलावं,कुठे बसावं, काही काहीच त्यांना सुचत नव्हतं! तेवढ्यात विजू, शितू त्यांच्या जवळ पोहोचल्या. विजू पुढं झाली आणि सोनूचा हात आपल्या हातात घेत हसतच म्हणाली... "हाय... मी विजया म्हात्रे अन् ही माझी मैत्रीण शितल माने. आणि तुम्ही?"
"आम्ही ना... मी सोनल आणि ही माझी बहीण मोनाली. बाबांची बदली इकडे झाल्यानं नाशिकहून आलोय.!" सोनू उत्साहानं बोलली. मात्र मोनू कुठं बसायला जागा मिळते का म्हणून वर्गात सगळीकडे नजर फिरवत अगदी शांतपणे उभी होती. तेवढ्यात शितू म्हणाली..." तुम्ही दोघी आज पहिल्यांदाच वर्गात आलात ना .... मग चला की आमच्याशेजारी बसायला... तो बाक मोकळाच आहे..."
"हो हो ... चालेल." आतापर्यंत गप्प असलेली मोनू लगेच बोलली. नंतर त्या दोघी मुलींंच्या घोळक्यातून चालत विजू अन् शितूसोबत तिसऱ्या रांगेतील बाकाजवळ आल्या. बाकावरील धूळ साफ करून सोनू मोनू तिथं निर्धास्तपणे बसत नाही तोच शितू त्यांना हसत म्हणाली... " तुमच्या दोघींच्या चेहऱ्यात इतकं कमालीचं साम्य आहे ना की बस्स! मला परत सांगणार का सोनल कोण आणि मोनाली कुठली ते?"
शितूनं विचारलेल्या प्रश्नावर सोनू खळखळून हसली. तिच्या हसण्यात विजू आणि आजूबाजूच्या मुलीही सामील होत्याच. मग सोनू हसतच म्हणाली... "हे बघ शितल, मला सोनू म्हणायचं आणि हिला मोनू... नाहीतर घोळ व्हायचा तुझा." एवढं बोलून तिनं लगेच मोनूला टाळी दिली. मग सोनू - मोनूची लवकरच विजू आणि शितूसोबत गट्टी जमली. तेवढ्यात वर्गावर बाई येत असल्याची मुलींना चाहूल लागली. काही क्षणातच सगळा वर्ग शांत झाला. वर्गशिक्षिका असलेल्या दाणीबाई वर्गात येताच सर्वांनी उभं राहून त्यांना अभिवादन केलं. मग त्यांनी सगळ्यांंची हजेरी घ्यायला सुरुवात केली... पल्लवी नंदूरकर.... रागिणी खोत... शितल माने... विनीता परांजपे...!
सर्व वर्गाची हजेरी पूर्ण झाली मात्र सोनू-मोनूची नावं बाईंनी घेतली नाही. त्यामुळे त्या दोघी आपल्या जागेवर उठून उभ्या राहिल्या. तेव्हा बाईंचं लक्ष त्यांच्याकडे गेलं... त्या सोनू अन् मोनू कडे आळीपाळीने आ वासून बघतच राहिल्या! मग न राहवून सोनू बाईंना म्हणाली, "बाई आमची हजेरी घेतली नाही हो तुम्ही..!"
तिच्या आवाजाने बाई भानावर आल्या आणि मग आपल्या पुस्तकातील एक कागद काढून तो वाचत त्या म्हणाल्या, "मोनाली कदम, सोनल कदम बरोबर ना... का गं तुम्ही दोघी जुळ्या बहिणी ना..?"
"हो बाई! अगदी बरोबर."
"बरं तुमची नावं मी लिहून घेते हजेरी बूकात...आणि हो, मागील दोन दिवसांचा अभ्यास अन् आपल्या वर्गातील एकंदर शिस्तीबाबत पल्लवी तुम्हाला सांगेलच. ती या वर्गाची माँनिटर आहे... बसून घ्या आता ..!" दाणीबाई भारदस्त आवाजात म्हणाल्या.
शाळा सुटल्यावर सोनू-मोनू, विजू अन् शितूसोबत वर्गाबाहेर पडल्या. मग शितल आणि विजू बस थांब्याकडे जायला निघाल्या.तेवढ्यात ने-आण करण्यासाठी ठरवलेली रिक्षा तेथे आली. सोनू, मोनू रिक्षात बसून घराकडे रवाना झाल्या. रस्त्याचं, निरनिराळ्या दुकानांचं निरीक्षण करत त्या घरी पोहचल्या. आजी समोर दिसताच दोघींनी आपापली दप्तरं बाजूला ठेवून तिला
No comments:
Post a Comment